धक्‍कादायक..काकाच्‍या हत्‍येची सुपारी देवून लग्‍नात झाला सहभागी; अल्‍पवयीन मुलाचा वापर

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक : नाशिकमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. काकाच्या हत्येची सुपारी पुतण्यानेच दिल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे हत्या करण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर करण्यात आला आहे 

नाशिकच्या अंबड- लिंक रोड गरवारे परिसरात बच्चू कर्डेले या वृद्धाचा खून हा त्यांच्याच पुतण्याने एका विधी संघर्षित बालकांसोबत कट रचून केल्याचे उघड झाले आहे. कोणाला संशय येऊ नये; म्हणून विधी संघर्षित बालकाने बुरखा परिधान करत कोयत्याने वार करून खून केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

प्रॅापर्टीच्‍या वादातून खून

प्रॉपर्टीच्या वादातून हा खून झाल्याच पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कोणाला आपल्यावर संशय येऊ नये; यासाठी मयत कर्डेले यांच्या खुनातील त्यांच्या मास्टर माईंड पुतण्याने विधी संघर्षित बालकाला घरातील कोठीत असलेली रक्कम घेऊन बच्चू कर्डेले यांचा काटा काढण्यास सांगितले. यानंतर तो नातेवाईकांच्या लग्नात घरच्या इतर मंडळींसोबत हजर होता. परंतु अखेर त्याच्या या मास्टरमाईंड प्लानचा उलगडा पोलिसांनी केला आहे.

विहिरीत आढळून आले साहित्‍य

घटनेतील संशयित विधीसंघर्षित बालकाने चोरून नेलेली कोठी पोलिसांना मयत बच्चू कर्डेले यांच्या शेजारच्या शेतातील विहिरीत मिळून आली आहे. तर या कोठीत बुरखा, कोयता आणि सोन्याचे दागिने काही कपडे आणि इतर वस्तू मिळून आल्या आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे त्या दिशेने देखील आता पोलीस तपास करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default