गुजरात निवडणुकीबरोबरच धुळ्यात देखील 128 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. यातच धुळे तालुक्यातील कावठी शिवारामध्ये सर्रासपणे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व धुळे तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने रात्रीच्या सुमारास पोलिसांनी हा बनावट दारूचा मिनी कारखाना उध्वस्त केला आहे.
१ कोटीचा मुद्देमाल जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे या कारवाईतील मुख्य आरोपी तेथील सरपंच महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सरपंच महिलेच्या पतीकडूनच हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता. पोलिसांनी या कारवाईदरम्यान दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी सात जणांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळले असून यातील तिघा आरोपी सध्या फरार आहेत.
