नंदुरबार जिल्ह्यातील रेशनचा काळाबाजार हा किती मोठ्या प्रमाणावर होत असेल त्याचा अंदाज लावणे अवघड आहे. त्यामुळे प्रशासनाने रेशनचा काळ्या बाजारात विक्री करणाऱ्याचा छडा लावण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ३२८० रुपये मुद्देमाल २ क्विंटल गहू व ९.६० क्विंटल तांदूळ व मालवाहू गाडी २ लाख रुपये किंमत असा एकूण २ लक्ष ३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल नंदुरबार तालुका पोलिसांनी जप्त केला. चालक अजीम शेख यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
