धरणगाव/ प्रतिनिधी : धरणगाव येथील पी.आर हायस्कूल मध्ये मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरू असलेल्यामुळे येथील सेवा कार्यरत कर्मचारी कै.शरद रामलाल बन्सी हे पी.आर हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते परंतु ते कोरोना या आजाराने निधन झाले त्यांच्या मृत्यूचे राजकारण करून त्यांच्या पत्नी तिलोत्तमा शरद बन्सी व मुलगा प्रशांत शरद बन्सी यांना त्रास कसा देता येईल या दृष्ट हेतू येथील अध्यक्ष.ए.के.कुलकर्णी, उपाध्यक्ष.व्ही.टी.गालापुरे , सचिव .एम.एस.डहाळे , सदस्य. एन.एस.नारखेडे, सदस्य एस.वाय.परिहार, सदस्य.पी.एच.बडगुजर, सदस्य.ए.ए.पगारिया , सदस्य.के.पी.डेडीया.सदस्य.एन.डी.पाटील.,सदस्य.आर.बी.भाटीया.माजीमुख्याध्यापक.संजय मुरलीधर अमृतकर व संचालक मंडळ व कर्मचारी कायद्याची पायमल्ली करून कै.शरद बन्सी यांच्या धर्म पत्नी तिलोत्तमा शरद बन्सी व मुलगा प्रशांत शरद बन्सी यांना मुद्दामहून मानसिक व आर्थिक त्रास दिलेला आहे कै.शरद बन्सी यांच्या धर्म पत्नी तिलोत्तमा शरद बन्सी या स्वतः शाळेत जाऊन भेटले होते पण त्यांनी काहीही मदत न करता उलट एकही अर्ज न स्वीकारला नाही व मुद्दामहून दिशाभूल केलेले आहे त्यांनी असे सांगितले की सर्व अधिकार हे शिक्षण अधिकारी जळगाव यांना आहेत त्यामुळे तेथे अर्ज दाखल करावा तसेच आमचे संचालक मंडळ आम्हाला सांगितील तसे वागावे लागते असे सांगितले आहे त्यामुळे बन्सी यांच्या धर्म पत्नी तिलोत्तमा शरद बन्सी या जळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी यांना अर्ज दाखल केलेले आहे त्यामुळे दोन महिने उलटून ही विभाग यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी समोर गेले असता त्यांनी असे सांगितले की आमच्या कार्यालयाचा काही एक संबंध येत नाही व मयत कर्मचारी यांचे सर्वा प्रकरण व प्रस्ताव हे शाळेतील मुख्याध्यापकांने पाठवयाचे असतात त्यानंतर ही बाब लक्षात आली शाळेतील मुख्याध्यापकांने व संचालक मंडळ यांनी मुद्दामहून खोटी माहिती देऊन दिशाभूल केलेले आहे व यांच्या परिवार यांची जबरदस्त आर्थिक व मानसिक मानहानी केलेली आहे शत्रुत्व भावना कशी वाढेल व त्यांच्या गैरफायदा घेवून यांना त्यांचें कायदेशीर हक्कापासून व अधिकारापासून कसं वंचित करता येईल हीच बाब संचालक मंडळ व कर्मचारी यांनी समोर ठेवलेली आहे त्यामुळे बन्सी यांच्या कुटुंबीयांना अतिशय मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे हे सर्व जातीय आकास बुध्दीने केलेले आहे त्यामुळे संचालक मंडळ व कर्मचारी यांचेवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अधिनियम १९८९ अधिनियम क्रमांक ३३ दि ९/८/२०१९ अन्वये सुधारित अधिनियम क ३४, मधील कलम ३ (यु) प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे
3/related/default
