डॉक्टरने मैत्रिणीला रागावलं, वॉर्डबॉयचं डोकं फिरलं; नाशकात महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक: नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिकमधील गंगापूर रोडवरील निम्स हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या वॉर्डबॉयने दवाखान्यातील कात्रीने महिला डॉक्टरच्या शरीरावर सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला आहे.
अनिकेत डोंगरे असे या संशयित हल्लेखोराचे नाव असून, त्याने दुपारी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरुन कात्रीने महिला डॉक्टरच्या मानेवर उजव्या बाजूस आणि पोटाच्या उजव्या बाजूस वार करून महिला डॉक्टरला गंभीर जखमी केले. या महिला डॉक्टरला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी संशयित आरोपीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयित आरोपीची मैत्रीण त्याच दवाखान्यात नर्स म्हणून कामाला असून, महिला डॉक्टरने या मैत्रिणीला काही कारणामुळे रागावले होते.

याचा राग मनात धरून संशयित आरोपीने महिला डॉक्टरवर हल्ला केल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. दरम्यान,रुग्णालयातच महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default