विखरण तालुका शिरपूर जिल्हा येथे राजमाता जिजाऊ सार्वजनिक ग्रामविकास वाचनालय कैलासवासी भाईदास आप्पा सेवाभावी संस्था विखरण यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन प्राथमिक उपकेंद्र पटांगणात वृक्ष लागवड करण्यात आली यासाठी खास योगदान
कै. माजी सरपंच महारू झिंगा पाटील यांच्या सन्मानार्थ यांचे सुपुत्र उद्योजक रवींद्र महारु पाटील इन्फोटेक कॅम्पुटर शिरपूर यांच्या वतीने पाच झाड कै. मनोहर झिपा पवार यांच्या सनमानार्थ यांचे सुपुत्र निरंजन मनोहर पवार कडून पाच झाडे स्वामी समर्थ कोल डेपो चे मालक राजेंद्र पाटील सर यांच्याकडून पाच झाड कै साहेबराव नामदेव पाटील यांच्या स्मणार्थ यांचे सुपुत्र प्रमोद साहेबराव पाटील उर्फ पमू अण्णा यांच्याकडून दोन झाड कै. मनोहर प्रताप पाटील यांच्या सन्मानार्थ त्यांचे लहान बंधू गणेश प्रताप पाटील यांच्याकडून पाच झाडे कै. विठ्ठल गंगाराम पाटील माजी सरपंच विखरण कै. रघुनाथ राजाराम पाटील विखरण यांच्या स्मणार्थ संस्था आणि वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप भाईदास पाटील यांच्याकडून प्रत्येकी एक एक झाड लावण्यात आले याप्रसंगी संस्था आणि वाचनालयास वृक्ष देणाऱ्या बांधवांचा लेखक गौतम निकम लिखित राजमाता जिजाऊ भोसले हा ग्रंथ भेट देण्यात आला संस्था आणि वाचनालय या कार्यास हातभार लावणाऱ्या सगळ्या नागरिकांचं गावकऱ्यांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था आणि वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप भाईदास पाटील हे होते सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तुषार ठाकरे यांनी केलं कार्यक्रमाचे उद्घाटक शिवमती वनीताताई मोहन पाटील विखरण गणाच्या प.स. सदस्य ह्या होत्या ज्यांनी झाडांची संकल्पना मनात आणली ते शामकांत भाऊ शिवाजीराव पाटील बोराडी सामाजिक कार्यकर्ते हे पण उपस्थित होते साने गुरुजी विद्यालय विखरणच्या परिवेक्षिका कल्पनाताई ऐशी विखरण गावाच्या सरपंच शिवमती मीनाताई पाटील उपसरपंच शिवमती रूपालीताई धनगर कैलासवासी भाईदास आप्पा महिला महिला बचत गटाच्या अध्यक्षा शिवमती सुभद्रा ताई
शिवमती डॉक्टर चित्ते मॅडम डॉक्टर प्रताप सिंग पावरा डॉक्टर महेंद्र पाटील सेंट्रल बँकेच्या कॅशियर कुणीकाताई तितरमाळे आणि लोन ऑफिसर दीपिका शेवाळे ताई विखरण गावाच्या तलाठी गायकवाड सुमित्रा ताई आर्थे गावच्या सरपंच मनीषाताई यांचे प्रतिनिधी मनोहर पाटील प्रशांत दादा पाटील विखरण विविध का. सोसायटीचे खु।। व्हाय चेअरमन साहेबराव धनगर विविध का.सोसायटी बु।। सदस्य विजय पाटील
सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या संपूर्ण स्टॉप कर्मचारी ज्यांनी ही दवाखान्याची वास्तू उभी केली ते इंजिनियर रावसाहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा राजमाता जिजाऊ भोसले हा ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन मान सन्मान करण्यात आला राजमाता जिजाऊ काळातील शासन प्रशासन आणि व्यवस्था शिवशाहीतील एक आदर्श व्यवस्था होती पण आजची गावाची राजकीय व्यवस्था ही नागरिकांना देशोधडीला लावणारी आहे लोकशाहीला घातक आहे शिक्षण बेरोजगार नेतागिरी महिला विद्यार्थिनींचा मान सन्मान शेतकरी या सगळ्यांना देशोधडीला लावण्याचे काम होत आहे एक महिला सरपंच नऊ महिला सदस्य असल्यावर सुद्धा महिलांच्या संदर्भात जनजागृतीचा कोणताही कार्यक्रम होताना दिसत नाही या सगळ्या गोष्टीला कारणीभूत इथली पुरुष सत्ताक व्यवस्था आहे अशी खंत कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी व्यक्त केली याप्रसंगी मुख्ध्यापक शैलेंद्र अहिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं शाळेतील विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषित आपलं मनोगत व्यक्त केलं साने गुरुजी विद्यालय विखरणच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वंदना म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे आभार तुषार ठाकरे यांनी मांडले
