शहरात अवैध शिकार करुन हरणाचे मांस आणल्याची माहिती श्री. संधू यांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच श्री. संधू, आझादनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावीद खाटिक, वन परिमंडळ अधिकारी अतुल देवरे, सहाय्यक पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक, आझादनगर पाेलिस आदिंनी संयुक्तरित्या शरजील अंजुम यांच्या घराजवळ छापा टाकला असता हरणाचे मांस मिळून आले. डाॅ. खाटिक यांनी घटनास्थळी मांस जप्त केल्यानंतर मांस व अन्य वस्तुंची तपासणी केली. यावेळी हरणाचे मुंडके, कान व कातडीसह तसेच चारही पाय व खुरे मिळून आले. त्यावरुन चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करुन हे मांस आणल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे डॉ. खाटिक यांनी ‘सकाळ’ला सांगितले.हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?
पोलिस हरणाची शिकार कोठे केली? मांस कोठून आणले? मांस आणण्याचे प्रयोजन काय? संशयितानेच शिकार केली की अन्य कोणी? याबाबत चौकशी करीत आहेत. शहरात आगामी काळात वन्य प्राण्यांची शिकार करुन मांस आणणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा श्री. संधू यांनी दिला आहे. रात्री उशिरा शरजील अंजुम विरुध्द आझादनगर पाेलिस ठाण्यात वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
