ओसाड शहर सूफी संताची भूमी असून शहराला ऐतिहासिक वारसा आहे. अशा शहरात मागील अनेक महिन्यांपासून अनेक लॉजवर देहविक्री तसेच इतर गैर कृत्य सर्रासपणे केले जात आहेत. अल्पवयीन मुलीला लॉजवर आणून देह विक्री करण्यात येत आहे. याबाबत या पूर्वीही अनेक सामाजिक संघटनांनी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन दिले होते
काही दिवसच हा व्यवसाय बंद राहिला आणि पुन्हा मोठ्या प्रमाणावर हा वेश्याव्यवसाय सुरू झाला. लॉजवर प्रवेश करताना कुठल्याच प्रकारे शासकीय नियमांचे पालन केले जात नाही. यात आधार कार्ड, येणाऱ्या जोडप्याची रजिस्टरवर नोंद नसणे शाळकरी अल्पवयीन मूले -मुली या लॉजवर जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापिक करीत आहेत. यामुळे शहरातील वातावरण दुषीत होत आहे. सदर लॉजवर तातडीने कारवाई करून असे लॉज बंद करण्यात यावे आणि अशा लॉजचे परवाने रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
