धुळ्यात भरधाव टँकरने वाहनांना उडविले

फुले शाहू आंबेडकर
0

शहरातील संतोषी माता चौक ते फाशीपूल दरम्यान गुजरात कडे जाणाऱ्या भरधाव टॅंकरने (tanker) तीन ते चार वाहनांना (vehicles) जोरदार धडक (hit hard) दिली. त्यात काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात असून या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळतात धुळे शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आज रात्री साडेनऊ ते दहा वाजे दरम्यान हा अपघात झाला.

टँकर चालक हा नशेमध्ये असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून राजेंद्र सिंग सकट असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अपघातातील दोन जखमीची नावे समजली असून त्यांना जिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुचाकी, आटोरिक्षा, व्हॅनसह काही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय येथे जखमींची पाहणी केली व कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन धुळेकर नागरिकांना केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default