कापूस चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना दिले. शोध सुरू असताना मंगळवारी (ता. १०) पोलिस अधीक्षक पाटील यांना गुप्त माहिती मिळाली. त्यात तलवाडे गावातील दिलीप भिल व साथीदारांनी वैंदाणे शिवारातून कापूस चोरी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तत्काळ पथक तलवाडे गावात पाठविले व दिलीपला ताब्यात घेतले.त्याने नाव दिलीप किशोर भिल (वय २०, रा. तलवाडे, ता.जि. नंदुरबार, मू.रा. पिक्चर टॉकीजवळील भिलाटी, साक्री, ता. साक्री, जि. धुळे) असे सांगितले. कापूस चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर साथीदार ऋतिक ठाकरे (रा. तलवाडे, ता.जि. नंदुरबार), सुरेश माळीच (रा. कोकल, ता. साक्री), जगदीश माळचे, प्रमोद शिवदे (सर्व रा. कावठी, ता. साक्री) यांच्या मदतीने चोरल्याचे कबूल केले. ऋतिक ठाकरे यास तलवाडे गावातून ताब्यात घेतले.हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?
शेतातून पांढरे सोने चोरणारी टोळी ताब्यात
शुक्रवार, जानेवारी १३, २०२३
0
नंदुरबार : शेतकऱ्यांनी राबराब राबून मोठ्या कष्टाने व अस्मानी-सुलतानी संकटांना तोंड देत नुकसानीचा मार सहन करीत शेतात पिकविलेल्या पांढऱ्या सोन्यावरच आता चोरट्यांनी डल्ला मारून कष्टकऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.या टोळीला अटक करून चोरीसाठी वापरलेली बोलेरो व ॲपे रिक्षा अशी सहा लाखांची वाहने जप्त केली आहेत. तलवाडे बुद्रुक येथील राहुल साहेबराव पाटील यांचा वैंदाणे शिवारातील गट क्रमांक २८२/२ मधील पत्राटी घरात साठवून ठेवलेला ४२ हजारांचा सहा क्विंटल कापूस चोरट्यांनी लांबविला. त्यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे आढावा बैठकीत कापूस चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला
Tags
