शिरपूर शहरातील मराठा गल्ली येथे रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान संशयीत मनोज मराठे हा सार्वजनिक शौचालया बाहेर लघुशंका करत असल्याचे लक्षात आले. यानंतर, रामभाऊ माळी (वय 36) याने संबंधित मनोज मराठे यास उघड्यावर लघुशंका का करतो? असे म्हणत हटकले. याचाच राग मनात धरत मनोज मराठेने रामभाऊ माळी या तरुणास रागाच्या भरात रस्त्यावर आपटले. यात माळी हा गंभीररित्या जखमी झाला.
फरार संशयीत ताब्यात
यानंतर मनोज मराठे याने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ भगवान माळी यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. डोक्यात जबर मार लागल्याने भगवान माळी याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फरार असलेल्या मनोज मराठे या संशयीताच्या 24 तासाच्या आत पकळले आहे.
