सावधान ...अंगणवाडीतील पोषण आहाराचे सेवन करताय.. तर ही बातमी उघडेल तुमचे डोळे....

फुले शाहू आंबेडकर
0

तालुक्यातील आसोदा येथील अंगणवाडीमार्फत गरोदर माता  व त्यांच्या बालकांना देण्यात येणार्‍या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेटामध्ये मृत पाल  आढळून आली आहे.या धक्कादायक प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे गरोदर माता, लहान मुलांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. यासंदर्भात एका लाभार्थी पालकाने अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो. याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या मुलांनाही हा पोषण आहार दिला जातो. त्याचप्रमाने जळगाव तालुक्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येणार्‍या सील बंद शालेय पोषण आहारात मृतपाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

त्याचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणात चौकशी करण्यात येवून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप पंतगे यांनी दिली आहे. तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांच्याकडे देखील संबंधितांनी तक्रार केली असून याप्रकरणी पुरवठादाराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default