मुलाच्‍या दुर्देवी मृत्‍यूने कुटूंबासाठी काळी संक्रांत; पतंग उडविणे पडले महागात

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : मकरसंक्रांत असल्‍याने लहानांपासून मोठ्यापर्यंत पतंग उडविण्याची हौस पुर्ण केली जाते. परंतु, ही हौस महागात पडली आहे. पतंग उडवित असताना दहा वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्‍यू झाल्‍याची दुर्देवी घटना हिंगोणे (ता. धरणगाव येथे आज घडली. 

कळमसरे (ता. अमळनेर येथील मुळचे रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्ताने हिंगोणे येथे स्थायिक झाले आहे. महाजन कुटुंबातील अक्षय संजय महाजन (वय १०) हा मुलगा मकरसंक्रांत असल्‍याने सकाळपासूनच पतंग उडवत होता. परंतु, पतंग उडविताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा पाचवीत शिकत होता.

नागरीकांनी काढले बाहेर पण..

अक्षय विहिरीत पडल्याचे समजताच परिसरातील नागरीकांनी विहिरीकडे धाव घेत त्याला बाहेर काढले. मात्र तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षयच्‍या दुर्देवी मृत्‍यूने हिंगोणे व कळमसरे गावावर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default