पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी पोतेभर खोटे दागिने, असे का घडते?, मंदिर प्रशासनाने सांगितले

फुले शाहू आंबेडकर
0
पंढरपूर : आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या आयुष्यात सुख-शांती येण्यासाठी अनेक भाविक आपली श्रद्धा असलेल्या देवाकडे नवस बोलत असतात. मात्र, कधी कधी या भाविकांकडून देवाला खोटे दागिने देखील अर्पण केले जातात. कधी भाविक आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे असे करतात किंवा मग सराफांकडून अशा भाविकांची चक्क फसवणूक होते. याचाच परिणाम म्हणून पंढरपुरच्या विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये पोते भरून खोटे दागिने अर्पण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
देवाला खोटे दागिने अर्पण होणे ही काही नवीन गोष्ट नाही. दर महिन्याला दोनपेटी उघडल्यानंतर पैशांसह असे खोटे दागिने देखील असतातच. या दागिन्यांची तपासणी करण्यासाठी सराफांना बोलावले जाते. हे सराफ असे खोटे दागिने वेगळे काढतात.

पंढरपूरच्या विठुरायाकडे ३१ किलो सोने आणि १ हजार ५० किलो चांदी जमा झाली आहे. आता या दागिंन्यापासून विटा करण्यात येणार आहेत. दरवर्षी विठ्ठलाच्या खजिन्यात साधारण ३ किलो सोने आणि २०० किलो चांदीची वाढ होते. मात्र, हे दागिने अर्पण करणाऱ्या भाविकांची दागिने खरेदी करताना होणारी फसवणूक टाळणे गरजेचे असून भाविकांनी देखील सराफाकडून खरेदीनंतर पावती घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
 मुंबईतील एका विठ्ठलभक्ताने आपल्या पतीची अंतिम इच्छा पूर्ण व्हावी यासाठी विठ्ठल मंदिरात एक कोटी रुपयांचे गुप्तदान अर्पण केले होते. विठ्ठल मंदिरात झालेल्या दानाच्या इतिहासात हे आतापर्यंतचे सर्वात मोठे दान आहे. या दानशूर विठ्ठलभक्ताच्या पतीचे करोनाकाळात जून २०२१ मध्ये निधन झाले होते. आपल्या निधनानंतर आपल्या विमा कंपनीकडून येणारी रक्कम विठ्ठल मंदिरात दान द्यावी अशी अंतिम इच्छा पतीने आपल्या कुटुंबीयांना बोलून दाखवली होती. ही इ्च्छा व्यक्त केल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले होते. म्हणून त्यांच्या विम्याची रक्कम विठुरायाच्या चरणी दान करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default