तुमच्या नवऱ्याला लॉटरी लागलीय... आफताबचा अजबच फंडा, पुण्यात घातला धुमाकूळ

फुले शाहू आंबेडकर
0
पुणेः लॉटरी लागल्याचं खोटंनाटं सांगून महिलांना आणि वृद्धांना लुटणारा एक ठग सिंहगड पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून साधारण १० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.
पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन लॉटरी लागल्याचे सांगून फसवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. वृध्द महिलांना तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे आणि तुमच्यासाठी गिफ्ट आहे, असे आमिष दाखवून लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अखेर पकडले.आफताब उर्फ साजिद अहमद शेख असे आरोपीचे नाव. तो मूळचा हैदराबादचा आहे.त्याच्या विरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेही वाचाः गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात दहा ठिकाणी दहा गुन्ह्यात एकच "मोडस" (प्रकार) आरोपीने वापरली आहे. तुमच्या नवऱ्याला बक्षीस लागला आहे, त्यासाठी पैसे द्या असे कारण असो किंवा तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे, त्यासाठी पैसे लागतील. तुमचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला आहे. तुम्ही येऊन भेटा असे वेगवेगळे आमिष दाखवून अहमद हा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जाळ्यात ओढायचा.वयाचा फायदा घेत तो या ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या उद्देशाने शांत जागेत नेऊन त्यांच्या अंगावर असलेले दागिने लुटायचा. आरोपीकडून 15 तोळे सोनं एक बुलेट जप्त करण्यात आले आहे. अहमदने पुण्यात ९ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं आहे.
आरोपीकडून पोलिसांनी ९ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, १ लाख रुपये किंमतीची बुलेट मोटार बाईक असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default