यात्रेत अल्पवयीन तरुणीला इशारे, भाऊ मदतीला धावला; पण तरुणीनं केलं भयंकर कृत्य; अख्ख गाव हादरलं

फुले शाहू आंबेडकर
0

अमरावतीतील धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावातीलच एका २३ वर्षीय तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे

अमरावती : धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या गावातीलच एक २३ वर्षीय तरुणाने काही दिवसांपासून तरुणीला त्रास देत होता. मंगळवारी दुपारीही शंकरपटाच्या यात्रेतही त्याने संबधित तरुणीला हातवारे केले. त्याच्या याच त्रासाला कंटाळूनच अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केल्याची तक्रार तरुणीच्या वडिलांनी तळेगाव दशासर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. दरम्यान, पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
तौफिक शेख हाफिज शेख (२३, रा. तळेगाव दशासर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका १७ वर्षीय तरुणीला मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. तौफिक त्रास देत असल्याचे एक महिन्यांपूर्वी तरुणीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर तरुणीचा चुलत भाऊ तसेच मामांनी त्याला समजावून सांगितले होते. त्यावेळी त्याने यापुढे त्रास देणार नसल्याचे सांगितले होते.
दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास संबधित तरुणी महाविद्यालयातून घरी आल्यानंतर गावातच सूरू असलेल्या शंकरपटाच्या यात्रेत गेली होती. या यात्रेत तरुणीच्या मागे मागे तौफिक शेख फिरत होता. त्याने या तरुणीला इशारेसुद्धा केले. ही बाब तरुणीच्या चुलत भावाने पाहिली. त्यामुळे त्याने तौफिकला हटकले. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद सुद्धा झाला
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अल्पवयीन तरुणीने घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. तौफिकच्या त्रासामुळेच मुलीने हे पाऊल उचलले, अशी तक्रार तरुणीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनी तौफिक शेख विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default