क्रेडीट लोनचे आमिष पडले महागात; सात लाख ६० हजारांत फसवणूक
सोमवार, जानेवारी २३, २०२३
0
जळगाव : व्यक्तिक कर्जाचे आमीष देत मंगरुळ (ता. अमळनेर) येथील तरुणाची तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली मिलिंद प्रकाश पाटील (वय २३, ह.मु. हिंजेवाडी, पुणे) याला बुधवारी (ता. १८ ) एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यात पर्सनल लोन व क्रेडिट कार्ड लोन देत असल्याचे बतावणी करण्यात आली. मिलिंद पाटील याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारला. नंबरच्या आधारे तरुणाच्या नावाने आलेल्या लोनची रक्कम आणि त्याच्या खात्यातील रक्कम, अशी एकूण ७ लाख ६० हजार रुपयांच्या रकमेला परस्पर ऑनलाईन परस्पर खात्यातून लंपास करून फसवणूक केली.
Tags
