एकीसाठी विहिरीत गळ टाकला, दुसरीचाही मृतदेह सापडला; धक्कादायक घटनेनं औरंगाबाद हादरलं

फुले शाहू आंबेडकर
0
औरंगाबाद येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह विहीरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वाती चव्हाण आणि शितल चव्हाण अशी या दोन मुलीची नावं आहेत.
याबाबाद आधीची माहिती अशी की, औरंगाबाद  जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील चिखलठाण येथून बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्वाती चव्हाण आणि शितल चव्हाण या दोघी बहिणी बेपत्ता असल्याची माहिती १४ जानेवारी रोजी ग्रामीण  पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
दत्तु चव्हाण हे शेतात घर बांधून राहतात. सोमवारी सकाळी याच शेतातील विहीरीत स्वातीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. तर तपासासाठी विहीरीतील पाण्यात टाकलेल्या गळाला शितलचा मृतदेह लागला. घटनेची माहिती मिळताच सपोनि टी आर भालेराव, पोउपनि राम बारहाते, सहाय्यक फौजदार सतिष खोसरे, कैलास करवंदे, संजय आटोळे, शिवदास बोराडे हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default