धुळे येथे महिलेचा खून करून संशयित फरार

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : शहरातील साक्री रोड परिसरातील जमनागिरी भिलाटी भागात एका ३५ वर्षीय महिलेचा खून झाल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आली.महिलेसोबत राहणाऱ्या व्यक्तीनेच मारहाण करत तिचा खून केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी संशयितावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत 
नीता वसंत गांगुर्डे (रा. घर क्रमांक ५, गोपाळनगरमागे, भिलाटी, जमनागिरी, धुळे) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेचा भाऊ सचिन वसंत गांगुर्डे (वय २८, रा. आंबेडकरनगर, गल्ली नं. ९ देवपूर, धुळे) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार, नीता गांगुर्डे या विनोद ऊर्फ बादल सोहिते (नाहार) (रा. गोपाळनगरमागे, भिलाटी जमनागिरी, धुळे) याच्यासोबत लग्न करण्यासाठी मार्च २०२० पासून घरातून निघून गेली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नीता या संशयित बादल सोहिते याच्यासोबत राहत होती.दरम्यान, बादलने शनिवारी (ता. १४) रात्री दहा ते रविवारी (ता. १५) सकाळी दहादरम्यान नीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण करून तिचा खून केल्याचे म्हटले आहे. फिर्यादीवरून बादल सोहिते याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. पी. पाटील, श्री. दामोदर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हिरे शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.सकाळी घटना उघडकीसरविवारी (ता. १५) सकाळी जमनागिरी भागात पाणीपुरवठा झाल्याने नीता गांगुर्डे यांच्या घरासमोर राहणारी एक मुलगी त्यांना सांगायला गेली. तेव्हा नीता या अंथरुणात मृतावस्थेत दिसून आल्या, मुलीने याबाबत आजूबाजूच्या लोकांना सांगितले. त्यानंतर तेथे एकच गर्दी केली. बादल हा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून नीताला मारहाण करत होता. शनिवारी रात्रीदेखील चारित्र्याच्या संशयावरून त्याने तिला बेदम मारहाण केल्याची व सकाळी साडेआठला बादल हा नेहमीप्रमाणे आपली रिक्षा घेऊन बाहेर पडल्याची परिसरात चर्चा होती. दरम्यान, बादल हा मनपात सफाई कर्मचारी म्हणूनही काम करत असल्याचे समजते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default