भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. आंदोलनात महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यामोठ्या संख्येने उपस्थित होत्या.युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.
अजितदादांनी इतिहास वाचावा
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही, ते स्वराज्य रक्षक असल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु, धर्मवीर हा त्यांचा इतिहास आहे. यामुळे अजितदादांनी इतिहास वाचावा. इतकी वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मवीर म्हटले जात आहे. हा इतिहास खोटा ठरविण्याचे काम पवार घराण्यांनी केला असल्याचे आमदार भोळे यांनी यावेळी सांगितले.
