यावेळी तेथे हजर कंपनी कर्मचारी काहीही बोलायला तयार नव्हते. कंपनीचे मालक हे गुजरातेत राहतात इतकीच माहिती असल्याचे सांगितले. इंडियन ऑईल कंपनीच्या पथकाने या इंधनाचे वीस नमुने घेतले असून ते तपासणीसाठी मुंबईतील फॉरेन्सीक लॅब येथे पाठविले आहे. महसुल विभागाचे नायब तहसीलदार अंगद आसटकर व पुरवठा निरिक्षक अतुल नागरगोजे यांनी स्वतंत्रपणे नमुने गोळा केले आहे. औद्योगिक वसाहतीतील या कंपनीसमोर दोन टँकर व एक मॅटेडोअर आढळून आला.
जीजे 030 एझेड 2150, जीजे 03 डब्ल्यु 8810 व जीजे 21 टी 5953 असे गुजरात पासिंगचे वाहने आढळून आले. या वाहनांमध्ये हा 80 हजार लिटरचा प्रचंड इंधन साठा आढळून आलेला आहे. भुसावळ शहरात यापूर्वी देखील अशा प्रकारचे इंधन विकले जाते, अशी ओरड ही होतीच. मात्र संबंधित विभागाशी लागेबांधे असल्याने याबाबत वाच्यता होत नव्हती.
इतक्या मोठ्या प्रमाणावर गुजरात कनेक्शन असलेला हा साठा भुसावळच्या बगलेत अर्थात खडका एमआयडीसी मध्ये आढळून आल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तसेच पोलिसांनी या संबंधीत दोन जणांना ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.
