मुंबई-आग्रा महामार्गावर पेट्रोलिंग करीत असतांना पोलिसांना सोनगीर फाट्यावरून एक जण दुचाकीवर गोणी बांधुन शिरपुरकडून धुळ्याकडे जातांना दिसला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यास थांबवुन त्याच्या दुचाकीवर असलेल्या गोणीची तपासणी केली असता त्यात गांजा सदृश्य अंमली पदार्थाचा माल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात काला. 1 लाख 7 हजार 200 रुपये किंमतीचा एकुण 13 किलो गांजा व 80 हजारांची दुचाकी (क्र. एमएच 18 बीबी 9647) असा एकुण 1 लाख 87 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोना नरेंद्रसिंग गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फिरोजअली शाकीर अली सैयद (वय 44 रा. सत्तार का वाडा, कबीरगंज, वडजाई रोड, धुळे) याच्याविरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 चे कलम 20 व 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई रविंद्र महाले हे करीत आहे
ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फड, पोसई रविंद्र महाले, पोसई संदीप दरवडे, पोसई विजय चौरे, असई अजय सोनवणे, पोहेकॉ संजय देवरे, पोना नरेंद्र गिरासे, सुरजकुमार सावळे, कमलेश महाले, रामकृष्ण बोरसे यांनी केली आहे.
