पाटण ता. शिंदखेडा येथे राहणार्या पीडित मुलीचा विवाह प्रभू राजू ठाकरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर ती गरोदर राहिल्याने प्रसूतीसाठी तिला कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे तिने एका मुलीस जन्म दिला.
पीडिता ही 13 वर्षे 3 महिने वयाची असल्याने ही माहिती शिंदखेडा पोलिसांना देण्यात आली. त्यावरुन पीडितेची फिर्याद नोंदवून घेत तिचा पती प्रभू ठाकरे याच्यासह सासरे राजू दंगल ठाकरे, सासू रेखाबाई राजू ठाकरे, मंगला बुरु ठाकरे सर्व (रा. इंदिरा नगर, पाटण) यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलिसांत बालविवाह प्रतिबंध अधि. 2006 चे कलम 9, 10, 11 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधि. 2012 चे कलम 4 , 6, 8 सह भादंवि कलम 376/2/जे, के, आय,एन प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मिलिंद पवार हे करत आहेत
