ग्रामविकास विभागाने तीन फेब्रुवारीला जाहीर केलेल्या शासन निर्णयात अनुसूची २५१५, १२३८ अंतर्गत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे होणार्या विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.येथे होतील विकासकामेफत्तेपूर फॉरेस्ट, गधडदेव, चाकडू, बुडकी, बुडकी विहीर (टेंभेपाडा), उमर्दा, पळासनेर (अमरधाम रस्ता), न्यू बोराडी, खार्यापाडा (टेंभेपाडा), पनाखेड, अमरीशनगर (आंबे), हिगाव, रोहिणी, लाकड्या हनुमान, नटवाडे, सुळे, येथे रस्ता काँक्रीटीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये,तिखीबर्डी, हनुमानपाडा (उमर्दा), सांगवी गाव, खंबाळे गावासाठी, चिलारे, सुभाष नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण व अन्य सुविधांसाठी १५ लाख रुपये, बलकुवे येथे सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १५ लाख रुपये, बोराडी येथे ओपन जिम साहित्य बसविण्यासाठी पाच लाख रुपये
नवी अंतुर्ली येथे काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख रुपये, भटाणे काँक्रीट रस्त्यासाठी १० लाख रुपये, वरूळ काँक्रीट रस्त्यासाठी साडेसात लाख, लोंढरे येथे काँक्रीट रस्त्यासाठी साडेसात लाख, बाभुळदे येथे गावअंतर्गत सोई सुविधांसाठी १० लाख रुपये, टेंभे बु. येथे १० लाख रुपये,करवंद येथील गोरक्षनाथ मंदिर येथे सोई सुविधांसाठी १५ लाख रुपये, करवंद येथे काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख रुपये, शिंगावे येथे काँक्रीट रस्त्यासाठी १० लाख रुपये, कळमसरे येथे काँक्रीट रस्त्यासाठी १० लाख रुपये, उंटावद येथे सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रुपये, पिंप्री येथे गावअंतर्गत सोई सुविधांसाठी १० लाख रुपये,हिसाळे गावात मलखान नगर येथे सोई सुविधांसाठी १० लाख रुपये, बभळाज येथे गावांतर्गत सोई सुविधांसाठी १० लाख रुपये, बभळाज येथे गावांतर्गत सोई सुविधांसाठी १० लाख रुपये, होळ येथे काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख, भाटपुरा येथे काँक्रीट रस्त्यासाठी १० लाख रुपये, मांजरोद येथे काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख रुपये, सावळदे गावांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ते कै. सुभाष जिभाऊ यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख रुपये, कै.सुभाष जिभाऊ यांच्या घरापासून तापी नदीकडील रस्त्यापर्यंत काँक्रीटीकरणासाठी १५ लाख रुपये.
