जंगल सपाट करणारे पोकलेन शिरपूर येथे जप्त

फुले शाहू आंबेडकर
0
कारवाईत पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. होऱ्या‍पाणीजवळ पिंप्राळा येथील वनक्षेत्रात ४ फेब्रुवारीला जंगल सपाटीकरणाचे काम अवैधरीत्या सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.सहाय्यक वनसंरक्षक आनंद मेश्राम, वनक्षेत्रपाल के. डी. देवरे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने जाऊन पाहणी केली असता पोकलेन (एमएच १५, जीएफ ३४९५) अवैध खोदकाम व सपाटीकरण करीत असल्याचे आढळले आहे  
पोकलेन यंत्र जप्त करून त्यासोबत असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली. संशयितांमध्ये पोकलेनचालक चूडामण कुमार शहा, राजेंद्र अरुण चव्हाण, बाबूलाल भगवान कोकणी (तिघे रा. सांगवी, ता. शिरपूर), जामलाल टिका पावरा व सुरेश टिका पावरा (दोघे रा. डाबक्यापाडा, ता. शिरपूर) यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default