रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; येत्या ७ ते ९ फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप बंद राहणार, कारण...

फुले शाहू आंबेडकर
0
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने राज्यभरात तीन दिवस रेशन बंद आंदाेलन पुकारले आहे. येत्या सात, आठ आणि दहा फेब्रुवारीला रेशन धान्य वाटप करु नये असे आवाहन रेशन दुकानदारांना केले आहे
अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाने आज जालन्यात  झालेल्या रेशन दुकानदारांच्या मेळाव्यात संपाचा निर्णय घेतला. कोरोना काळापासून सुरु असलेल्या मोफत धान्य वाटपाचं अद्याप कमिशन मिळालेलं नाही. त्याचबरोबर कमिशनमध्ये वाढ व्हावी आणि सर्व गरीब जनतेला पूर्वीप्रमाणे मोफत धान्य वाटप व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदाेलन छेडले जात आहे.
या संपात राज्यभरातील 55 हजार रेशन  दुकानदार सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली. विजयकुमार पंडीत (जाॅईंट सेक्रेटरी, रेशन दुकानदार संघटना) म्हणाले आमच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे सरकार  त्या पुर्ण करेल असा आम्हांला विश्वास आहे. परंतु मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन  छेडले जाईल असा इशारा देखील पंडीत यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default