मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी करून उदरिर्वाह करणाऱ्या पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. नागपूर ची आमडी भागात ही घटना घडली आहे.
मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच खोलीत आत्महत्या केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमडी येथे घडली. कुसूम युवनाती असे मृत पत्नीचे तर मधुकर युवनाती असे आरोपी पतीचे नाव आहे
नेमकं काय घडलं?
नागपुरात आमडी भागात कुसूम युवनाती या त्यांच्या पती मधुकर युवनातीसोबत राहत होत्या. या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं. मधूकर दारूच्या नशेत असल्याने त्याने पत्नी कुसूमच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. या जीवघेण्या हल्ल्यात पत्नी कुसूमचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती मधूकरने आत्महत्या केली.
ही धक्कदायक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात आमडी गावात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोघे पती-पत्नी मूळचे मध्यप्रदेशचे आहेत. दोघे मजुरीसाठी रामटेकला आले होते. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
