आली लहर केला कहर! खचाखच भरलेली बस थांबवून कंडक्टर दोन तास दारूच्या गुत्त्यावर

फुले शाहू आंबेडकर
0

एसटी बसचा कंडक्टर दारूची तलफ आल्यामुळे बस रस्त्यावर थांबवून थेट गुत्त्यावर गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कंडक्टरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे

दारूची तलफ आल्यामुळे कंडक्टरने लालपरी तब्बल दोन तास रस्त्याच्या कडेला थांबवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अखेर प्रवाश्यांनीच कंडक्टरला दारूच्या गुत्त्यावरून धरून आणलं. लातूर जिल्ह्यातल्या काटगावमधली ही घटना आहे.
लातूरहून कळंबला निघालेल्या कळंब आगाराच्या एम एच 11 बी.एल 9348 बस क्रमांकाच्या कंडक्टरने हा प्रताप केला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस साईडला लावून हा कंडक्टर कुणाला काहीही न सांगता गुत्त्यावर गेला.

बसमधले प्रवासी तब्बल दोन तास ताटकळत बसले होते. कंडक्टर नसल्यामुळे बसच्या ड्रायव्हरलाही बस पुढे नेता येत नव्हती.

कंटाळलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवासी बसमधून उतरून दुसऱ्या वाहनाने निघून गेले, पण काही प्रवासी तसेच बसून राहिले.

कंटाळलेल्या प्रवाशांनी बसच्या खाली उतरून ग्रामस्थांकडे कंडक्टरची विचारपूस केली, तेव्हा कंडक्टर गुत्त्यावर गेल्याचं त्यांना समजलं.
संतापलेल्या प्रवाशांनी थेट दारूच्या अड्ड्यावर जाऊन कंडक्टरची गचांडी धरली आणि बसमध्ये आणलं, यानंतर बस पुढे निघाली.

लातूरच्या जवळ असलेल्या काटगावमध्ये ही घटना घडली आहे.

एसटी महामंडळाने या कंडक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
सगळ्या प्रकाराचे फोटो एका प्रवाशानं लोकेशनसह काढले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default