सत्यजीत तांबेंनी गड राखला; मविआच्या शुभांगी पाटील यांचा पराभव

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक : नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले. हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस 
विभागात 49.28 टक्के मतदान झाले. आता सर्वांनाच या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. आज (ता. २) मतदानाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे.फेरी पहिलीपहिल्या फेरीच्या आकडेवारीनुसार सत्यजित तांबे आघाडीवर असून पहिल्या फेरीत त्यांना 15784 मते मिळाली आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पाटील यांना 7862 मते मिळाली आहेत. यासह इतर 14 उमेदवार पहिल्या फेरीत एक हजाराचा टप्पाही पार करु शकले नाहीयेत.
दुसऱ्या फेरीतही तांबेंची आघाडीदुसऱ्या फेरीच्या निकालातही सत्यजीत तांबे आघाडी राखली असून तब्बल दुप्पट मतांनी प्रतिस्पर्धी शुभांगी पाटील यांना मागे सारले आहे. दुसऱ्या फेरीत सत्यजीत तांबे यांना 31009 मते तर शुभांगी पाटील यांना 16316 मते मिळाली आहेत. यासह इतर 14 उमेदवार दुसऱ्या फेरीत एक हजाराचा टप्पाही पार करु शकले नाहीयेत.दुसऱ्या फेरीनंतर तब्बल 5445 मते अवैध असल्याचे समोर आले आहे.
आकडेवारी तिसऱ्या फेरीचीतिसऱ्या फेरीत सत्यजीत तांबेंना 45660 मते मिळाली आहेत तर शुभांगी पाटील यांना 24927 मते मिळाली आहेत. तिसऱ्या फेरी दरम्यान अवैध मतांची संख्या ही 8378 वर पोचली आहे.
आकडेवारी चौथ्या फेरीचीचौथ्या फेरीत सत्यजीत तांबेंना 60161 मते मिळाली आहेत तर शुभांगी पाटील यांना 33776 मते मिळाली आहेत. यासह इतर उमेदवारांमध्ये रतन बनसोडे आघाडीवर असून त्यांना 2297 मते मिळाली आहेत. चौथ्या फेरीदरम्यान अवैध मतांची संख्या ही 11240 वर पोचली आहेआकडेवारी पाचव्या फेरीचीपाचव्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांना मिळालेली मते 68 हजार 999 तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. एकूण 12997 मते अवैध ठरली.पाचव्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांना मिळालेली मते : 68 हजार 999 महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना मिळालेली मते : 39 हजार 534एकूण झालेले मतदान : 1 लाख 29 हजार 615 अअवैध ठरलेली मते : 12,997 वैध ठरलेली मते : 1 लाख 16 हजार 618

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default