याबाबत मोतीलाल बागुलाल परदेशी (रा. हिसाळे ता. शिरपूर) यांंनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तरडी शिवारातील गोविंद हिरालाल परदेशी यांच्या शेत गट नं. 214 मधील मक्याच्या शेतात दि. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याचा दोन्ही हात ओढणीने पाठीमागे बांधून व ओढणीने गळा आवळून खून केल्याचे दिसून आले.
ओढणीने गळा आवळून एकाचा खूनतरडीत शिवारात आढळला मृतदेह, थाळनेर पोलिसात गुन्हा
रविवार, फेब्रुवारी २६, २०२३
0
तरडी (ता.शिरपूर) शिवारात शुक्रवारी दोन्ही हात मागे बांधलेले आणि ओढणीच्या सहाय्याने गळफास दिलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्यामुळे गावाच एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपीने खून करून मृतदेह येथे टाकून पुरावा नष्ट केला. याप्रकरणी थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Tags
