असे आहे लाच प्रकरण
बोदवडमधील तक्रारदारासह त्याच्या तीन मित्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यात सी फायनल न्यायालयात पाठवण्यासाठी तपासाधिकारी असलेल्या हवालदार वसंत निकम यांनी प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे 20 हजारांची लाच मागितली होती मात्र चार हजार प्रत्येकी देण्याचे ठरल्यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली.
शनिवारी सकाळी 11.30 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात निकम यांनी पंटर बाविस्कर याच्याकडे लाच रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पंटराने लाच स्वीकारताच हवालदाराला अटक करण्यात आली.
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला
