मामा, दाजींची मदतीने बहिणीशी लग्नाचा तगादा लावणा-या युवकाचा भावाने काढला काटा

फुले शाहू आंबेडकर
0
एकतर्फी प्रेमातून बहिणी मागे लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाची  मुलीच्या भावाने हत्या केल्याची घटना नाशिक  जिल्ह्यात घडली आहे. ही घटना आडगाव परिसरात बुधवारी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. दाेघा संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून तिसरा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार मयत विकास रमेश नलावडे निलगिरी बाग परिसरात राहत होता. विकासचे ताे राहत असलेल्या परिसरातील एका तरुणीवर प्रेम होते. त्याला तरुणीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे विकासने तरुणीकडे सतत लग्नासाठी तगादा लावला होता.
तरुणीच्या भावाला हे समजले. त्याला या गोष्टीचा राग आल्याने त्याने बुधवारी (ता. 22 फेब्रुवारी) रात्री 10.30 वाजेच्या सुमारास निलगिरी बाग परिसरातील बिल्डिंग नंबर 5 समोर असलेल्या मोकळ्या जागेत "तू माझ्या बहिणीशी लग्न करायचे असे का बोलतो" या कारणावरून कुरापत काढून विकास रमेश नलावडे यास संशयितांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर तरुणीच्या भावाने दाेन साथीदारांसह धारदार शस्त्राने विकास याच्या पोटात आणि डोक्यात जबर वार करून त्यास गंभीर जखमी करून ठार मारले. 

या गुन्हामध्ये गुन्हे शोध पथक यांनी मुख्य संशयितास ताब्यात घेतले. त्यास त्याच्या इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्यासोबत त्याचा मामा व दाजी यांची नावे सांगितले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेतील तिसरा संशयित हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default