सतीश बापू मिस्तरी (वय ३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सतीश हा नित्यानंद सोसायटी मोहाडी उपनगर येथील रहिवासी असल्याचे उघडकीस आले आहे. रात्री हा तरुण आपल्या मित्रांसोबत या सुनसान ठिकाणी पार्टी करण्यासाठी आला असल्याचे देखील प्राथमिक माहितीत समोर आली आहे. त्यामुळे या तरुणाचा इतक्या निर्घृणपणे खुन कोठल्या कारणास्तव करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून या खुनाचा तपास पोलिसांतर्फे लावण्याचे काम सुरू आहे. खून कुठल्या कारणास्थत करण्यात आला. तसेच त्याचा खून कुणी केला याचा सर्व तपास आता पोलीस करीत आहेत.
