कॉपर केबल चोरटा जेरबंद; तिरंगा चौकातील चोरट्याचा कारनामा

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : सुझलॉन कंपनीच्या पवनचक्कीच्या टॉवरमधील कॉपर केबल लांबविणाऱ्या चोरट्याला निजामपूर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ट्रकसह बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाण्याच्या परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्कीच्या तीन टॉवरमधील वीजवाहनासाठी लावलेली सव्वादोन लाखांची ४८० मीटर कॉपर केबल चोरट्यांनी लंपास केली होती. त्यासंबंधी सुझलॉन कंपनीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. एल. गायकवाड यांनी तपासकामी पथक तयार केले. पथकाने घटनास्थळी पाहणी केली.तसेच पथकातील दीपक वारे यांना घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल धुळे येथील शेख आबीद शेख रसूल (रा. तिरंगा चौक, धुळे) याने चोरी केल्याचे समजले. त्यावरून पथकाने संशयित आबीदला ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातील तिरंगा चौकात ट्रकमध्ये (एमएच १९, झेड ५२९६) मुद्देमाल लपविल्याचे सांगितले 
ट्रकची तपासणी केली असता चार लाख ४० हजारांची कॉपर केबल व पवनचक्की टॉवरचे इतर साहित्य आढळले. आठ लाखांचा ट्रक व चार लाख ४० हजारांची केबल असा बारा लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शाखाली निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. एल. गायकवाड, दीपक वारे, श्री. मालचे, श्री. माळी, राकेश महाले, होंडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default