नंदुरबार शहरातील अतिशय वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या मच्छी बाजार परिसरात शुक्रवारी (५ फेब्रुवारी) रात्री उशीरा ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं
दरम्यान घटनेनंतर आरोपी हा स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली असून खबरदारीचा उपाय म्हणून नंदुरबारमध्ये आज (शनिवारी) अतिरिक्त कुमकसह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात शांतता आहे
नंदुरबार शहरातील मच्छी बाजार चौकात राहणाऱ्या एका मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. त्यानंतर ती मुलगी आपल्या पतीसोबत राहत होती. बहिणीने पळून जाऊन लग्न केलं याचा राग भावाचा मनात होता. याच रागातून त्याने बहिणीच्या नवऱ्याला भर बाजारात गाठले आणि त्याची धारधार शस्त्राने भोसकुन हत्या केली.
दरम्यान, हत्या केल्यानंतर तरुणाने पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणापूर्ण वातावरण आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे
