यात्रेसाठी निघालेली भाविकांची ओव्हरलोड गाडी नाल्यात कोसळली; तीन मुलांसह चौघांचा मृत्यू, 50 जण जखमी

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबारमध्ये गाडी उलटून झालेल्या अपघातात चार जणांना मृत्यू झाला आहे. तर 50 जण या अपघातात जखमी झाले आहेत. नंदुरबारमधील अतिदुर्गम भाग मानल्या जाणाऱ्या भराडीपादर गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. काल संध्याकाळी उशीरा हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही जण क्रुझर गाडीने यात्रेनिमित्त खापरला जात होते. मात्र क्रुझर गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. या दरम्यान चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातानंतर ही गाडी उतारावरुन थेट नाल्यात उलटली.
अपघातातील सर्व प्रवासी सातपुडा पर्वत रांगातील कोठली आणि इतर गावचे रहिवासी आहे. प्रवाशांमध्ये लहान मुले आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. मृतांमध्ये चार पैकी तीन मयत हे अल्पवयीन मुले आहेत.जखमींवर अक्कलकुवा आणि नंदुरबार सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default