महिलांना एसटी तिकिट दरात 50 टक्क्यांची सवलत...आणखी कोणाला मिळते सवलत, जाणून घ्या

फुले शाहू आंबेडकर
0

एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास भाड्यात सवलत जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या सवलतींबाबत

राज्याच्या अर्थसंकल्पात आज अनेक घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच घटकांसाठी घोषणा केल्या. महिलांना एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास केल्यास तिकीट दरात 50 टक्क्यांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. या महिला प्रवाशांच्या तिकीट दरातील 50 टक्के शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे. 
राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सवलत जाहीर करण्यात आली आहे. जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default