तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत ठेकेदार ( आहेत. त्यांनी मराविवि कंपनी अंतर्गत जिल्हा नियोजन योजनेत धुळे मंडळ कार्यालय अंतर्गत वीज जोडणी संदर्भात 2018-19 या वर्षात ठेका घेऊन 56 लाख 31 हजार 590 रूपयांचे काम पूर्ण केले होते. त्या कामाच्या सादर केलेल्या बिलात त्रूटी न काढता प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात अमर खोंडे व मनोज पगार यांनी तक्रारदाराकडे 5 लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती अडीच लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केली.
एसबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांचे प्रलंबित बिल काढण्यासाठी अमर खोंडे व
मनोज पगार यांनी 5 लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती अडीच लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
मागणी केलेल्या रक्कमेपैकी पहिला हप्ता दोन लाख रुपये स्वीकारताना अमर खोंडे व मनोज पगार यांना त्यांच्या केबीनमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले.
कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे
पोलीस अंमलदार शरद काटके, संतोष पावरा, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, सुधीर मोरे,
रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे यांच्या पथकाने केली.
