बेपत्ता तरुणाचा आढळला मृतदेहमित्रांच्या पार्टीला गेला अण् परतालाच नाही, घातपाताचा संशय

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील तरवाडे येथील समाधान दगा बागूल या बेपत्ता तरुणाचा आज (दि,२९) रोजी शहलागत असलेल्या करगाव गणपतीलगतच्या विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. मित्रांच्या पार्टीत जेवायला गेलेला समाधानाचा 15 दिवसानतंर शेतातील विहीरीत मृतदेह आढळल्यानेे एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सुरुवातीला चाळीगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली होती. परंतू आता शहर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंंतू घराचानी मात्र या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.प्राप्त माहितीनूसार तरुणाला उत्तमरित्या पोहता येत होते. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून कसा मृत्यू झाला ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी कसून शोध घेवा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default