अंधेरी नगरी चौपट राजा, शिरपूर तहसील कार्यालया समोर लाक्षणिक घंटानाद आंदोलन

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर/ प्रतिनिधी:  शिरपूर तालुक्यातील बेभान झालेल्या भ्रष्टाचार आणि अत्याचार विरोधात दिं- १३ मार्च रोजी सकाळी ११  वाजता शिरपूर तहसील कार्यालया समोर लाक्षणिक घंटानाद आंदोलन सुरू होणार आहे अशी माहिती जनसेवक आबासो ओंकार जाधव यांनी दिली आहे अशी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे १) शिरपूर तालुक्यातील कृषी पुरक उद्योग साखर कारखाना दहिवद , प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी तांडे, दूधसंघ सुरू होणे बाबत 
२) शिरपूर तालुक्यातील आदिवासींची शासनाने दिलेल्या अविभाज्य वनजमिनींचा शर्तभंग झालेल्या जमिनीची चौकशी होणे बाबत 
३) तापी नदीवरील सावळदे व गिधाडे पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळी लावणे बाबत 
४) कोव्हीड काळातील घरपट्टी पाणी नळपट्टीवर व्याज माफ करुन परत मिळणे बाबत, व सद्यस्थितीमध्ये अवाजवी घरपट्टी पाणीपट्टी वाढ रद्द करणे बाबत दुकान भाडे वाढ रद्द करणे बाबत. 
५) खंडेराव मंदिराच्या जवळील, दर्गाच्या समोरील अरुणावती नदीच्या काठावर असलेल्या घनकचराची  घाण हटवून डप्पींग ग्राऊंड ( घनकचराची आरक्षित जागा)  व्यवस्थापन निश्चित करणे बाबत 
६) शिरपूर तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी केलेल्या अतिक्रमणाची सखोल चौकशी होणे बाबत
७) शिरपूर तालुक्यातील अवैध धंद्यावर आळा बसणे बाबत
८) सावळदे जवळील तापी नदीकाठी निम्मं कॉलेजचे रेड झोन मध्ये झालेल्या बांधकामाची चौकशी होणे बाबत 
९) शिरपूर शहरासाठी शहर पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालया समोर होते बाबत 
१०) शिरपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचाराची चौकशी होवून सर्व सामान्य नागरिकांना रेशन कार्ड मिळणे बाबत
जनसेवक आबासो ओंकार जाधव ( मा.जि.प.सदस्य ) यांच्या ६१ व्या वाढदिवस साजरा न करता शिरपूर तालुक्यातील शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालया समोर लाक्षणीक घंटानाद उपोषण करण्यात येत आहे 
सन २०११ पासून दहिवद येथील शिवाजी सहकारी साखर कारखाना तसेच प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी तांडे व दुधसंघ बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, कर्मचारी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे व सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचा प्रमाण वाढले आहे तरी वरील कृषी पुरक उद्योग सुरू झाल्यास तालुक्यातील आर्थिक व्यवस्था सुधारेल व शेतकरी सुखी होईल.
तसेच महावितरण कंपनी कडून देण्यात येणाऱ्या बिलाचे विवरण व स्पष्टीकरण जनतेसमोर करण्यात यावे  त्याचबरोबर तापी पुलावरून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे त्या करिता तापी नदीवरील सावळदे व गिधाडे पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षण जाळी तात्काळ बसविण्यात यावी
कोव्हीड काळातील घरपट्टी पाणीपट्टीवर व्याज माफ करुन परत मिळावे व सद्यस्थितीमध्ये अवाजवी घरपट्टी वाढ रद्द करावे दुकानभाडे वाढ रद्द करावे
खंडेराव मंदिराच्या जवळील त्यांच्या समोरील अरुणावती नदीच्या काठावर असलेल्या घनकचराची घाण हटवून डप्पींग ग्राऊंड घनकचराची आरक्षित जागा व्यवस्थापन निश्चित करणे बाबत शिरपूर तालुक्यातील अवैध धंदा वाढल्यामुळे शिरपूर तालुक्याची प्रतिमा खालावत आहे त्याच्या परिणाम सर्व सामान्य जनतेवर होत आहे तरी या  अवैध धंदावर आळा बसावा शिरपूर तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी केलेल्या अतिक्रमणाची सखोल चौकशी व्हावी सावळदे जवळील तापी नदीकाठी निम्मं कॉलेजचे रेड झोन मध्ये झालेल्या बांधकामाची चौकशी व्हावी कारण त्याठिकाणी हजारो विद्यार्थी व शेकडो कर्मचारी यांचा जीव धोक्यात आहे तापी नदीच्या काठावरील गावांचे पुनर्वसन झाले असून निम्स कॉलेज रेड झोन मध्ये झालेल्या बांधकामाची चौकशी व्हावी शिरपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील भ्रष्टाचाराची चौकशी होवून सर्व सामान्य नागरिकांना शासनाने विविध योजना आरोग्यासाठी रेशन कार्ड वेळीच मिळाले पाहिजे.जिर्न झालेल्या व नवीन रेशनकार्ड वाटप करण्यात यावे. वरील विषयाबाबत शासन प्रशासनाने चौकशी करून तात्काळ दखल घेऊन कारवाई न केल्यास आम्ही सर्व शेतकरी कष्टकरी कर्मचारी व्यापारी रास्तारोको आंदोलन सुरू करू, जेलभरो आंदोलन सुरू करू त्यात होणारा परिणामास सामोरे जावे लागले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default