धडगाव, अक्कलकुवा शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील रहिवासी असलेल्या ८ उसतोड कामगारांची तीन तुकडी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरवाली येथे गेले होते. त्यांना डांबून ठेवलेल्या मजुरांची सुखरूप सुटका होऊन आज टेम्पोने धडगावकडे रवाना झाले आहे. त्यांच्यासह दुसऱ्या मालकाकडे अडकलेल्या ८ मजुरांची देखील सुटका करण्यात आली असून ते देखील या मजुरांसह एकाच वाहनात येत आहे. लहान बालके, महिला आणि पुरूष मिळून एकूण ४२ नागरिकांची सुटका झाली.
उसतोड मजुरांना डांबून ठेवण्याचा प्रकार हा नवीन नसून अनेक वेळा असा अमानुषातेचा प्रकार समोर आला आहे. याबाबतीत प्रशासनाच्यावतीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तालुक्यात रोजगार संधीच्या अभावी मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होते. त्या ठिकाणी मजुरांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. मजुरावर अमानुष वागणूक देणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे.
