रिक्षांमध्ये घरगुती गॅसचा अवैधपणे वापर; सिलेंडर दोघे पोलिसांच्‍या ताब्‍यात

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : रिक्षामध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर केला जात आहे. किती केले तरी याला आळा बसत नाही. असाच अवैधरित्या  गॅस भरणाऱ्या दोघांना धुळे पोलिसांनी दहा सिलेंडरच्या टाक्यांसह आणखी मुद्देमालासकट मुसक्या आवळत कारवाई केली आहे 

शहरातील मालेगाव रोडवरील गुजर कंपाउंडच्या बोळीमध्ये रीक्षामध्ये अवैधरित्या गॅस भरत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी गॅस सिलेंडरच्या टाक्यांसह जवळपास ९३ हजार रुपयांचा मध्यमाल हस्तगत केला आहे.

या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे अवैध पणे घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून सर्रासपणे वापर करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default