मानसिक धक्का बसू नये म्हणून बाळाचा मृत्यू झाल्याची गोष्ट महिलेपासून लपविण्यात आली होती, मात्र दुसऱ्या दिवशी मातेचाही अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला
जळगाव : लग्नानंतर ती घरात आली, पतीची हलाखीची परिस्थिती, त्यामुळे त्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट केले, व्यवसाय उभारत गावात ओळख निर्माण केली. कष्टाचे दिवस संपून आनंदाचे दिवस आले, घरात पाळणा हलणार म्हणून घरात आनंदाचे वातावरण असतानाच नियतीने क्रूर डाव साधला.
प्रसुतीसाठी तिला रुग्णालयाल हलवले, बाळ जन्माला आले पण जन्मानंतर अवघ्या दोन तासातच बाळाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी मातेचाही अतिरक्तस्त्रावाने मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील पाडळसरे गावात मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडलीय. घटनेने संपूर्ण गाव हळहळले, गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. जागृती अनिल कोळी (वय २२ वर्ष, रा. पाडळसरे ता. अमळनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
पाडळसरे गावात अनिल कोळी हे पत्नी जागृती कोळी हिच्यासोबत राहत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला. गर्भवती असलेल्या जागृतीला सोमवारी प्रसवकळा सुरु झाल्या. पती अनिल कोळी याने तिला तातडीने खाजगी वाहनातून अमळनेर तालुक्यातील मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले, मात्र जागृतीची प्रकृती बिकट असल्याने त्यांनी अमळनेर येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
याठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दुपारी चार वाजता जागृतीची प्रसूती झाली, तिला स्त्री जातीचे बाळ सुध्दा झाले. मात्र जागृतीने बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच म्हणजे जन्मानंतर अवघ्या दोन तासात बाळाचा मृत्यू झाला. तर आधीच गंभीर असलेल्या जागृतीची प्रकृती प्रसुतीनंतर रक्तश्राव थांबत नसल्याने आणखीनच चिंताजनक झाली ही नहीं ँँ
मानसिक धक्का बसू नये म्हणून बाळाचा मृत्यू झाल्याची गोष्ट जागृतीपासून लपविण्यात आली होती, त्यामुळे अमळनेर येथील डॉक्टरांनी जागृतीला धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचे सांगितले. दोन दिवसांपासून जागृतीची जीवन मृत्यूशी झुंज सुरु होती, याठिकाणी ही झुंज अपयशी ठरली, उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जागृतीची प्राणज्योल मालवली. अतिरक्तस्त्रावाने तिचा मृत्यू झाला.
