टोळीच्या ताब्यात असलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाची सुटका देखील पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी 11 जणांना बेड्या ठोकल्या
परभणी पोलिसांकडून स्थापन करण्यात आलेल्या मानवी तस्करी विभागाकडे मागच्या काही दिवसात परभणीत अपहरण आणि हरवलेल्या मुलांचा तपास देण्यात आला होता. दरम्यान पालम तालुक्यातील फळा येथील 4 वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाचे तपास देखील याच पथकाकडून सुरु होते. दरम्यान याच तपासात पोलिसांना दोन संशयित आरोपी मिळून आले होते. त्यांची अधिक चौकशी केली असता, मुलांचे अपहरण करून त्यांना विकणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत या टोळीतील 11 जणांना बेड्या ठोकल्या आहे.
असं सुरु होतं रॅकेट
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील आरोपी मोठ्या शिताफीने आपल्या नातेवाईकांच्या मुलांना आमिष दाखवून त्यांचे अपहरण करायचे. तसेच अपहरण केल्यावर या मुलांना परभणी, मराठवाडा तसेच हैदराबाद, विजयवाडा इथे कार्यरत असलेल्या विविध लोकांना 80 हजार ते 5 लाखांपर्यंत विकायचे. विशेष म्हणजे ज्यांना मुलबाळ नाही अशाच लोकांना हे रॅकेट अपहरण केलेले मुलं विकायचे. तर पोलिसांकडून या 11 आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस आणखी तपास करत आहे.
