गिरीश महाजन पोहचले बांधावर; अवकाळी पावसानंतर शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी

फुले शाहू आंबेडकर
0
साक्री तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात आज पालकमंत्री गिरीश महाजन  यांनी साक्री तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. 
 तालुक्‍यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे कांदा सोयाबीन, गहू त्याचबरोबर पपई, आंबा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहचून मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. त्याचबरोबर तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी कृषी विभागाला दिले.

भरपाई देण्याचे आश्‍वासन

लवकरात लवकर नुकसान भरपाई  मिळवून देणार असल्याचे देखील आश्वासन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार मंजुळा गावित, खासदार सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी देखील या शेती नुकसान पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी असल्याचे बघायला मिळाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default