सचिन हा विनायक नगर येथील शाळेत इयत्ता दहावीच्या वगीत शिकत होता.त्याचे वगीतील एका मुलीशी प्रेम संबंध होते. त्यांचे प्रेम प्रकरण परिसरात अनेक जणांना माहीत होते. त्याने सदर मुलीला मोबाईल देखील घेऊन दिला होता.या मोबाईल वर संपर्क साधून ते एकमेकांच्या भेटी घेत होते. चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या सचिनचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी वैजापूर तालुक्यातील भिवगाव शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली.
तो मृतदेह अपहरण झालेल्या सचिन काळेचा असल्याची खात्री पटली. हा मृतदेह मुलीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर पडलेला होता. मृतदेहावर पोलीसांना काही जखमा मिळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधिक्षक महक स्वामी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, मोईस बेग, राम कवडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणात मुलीचे आई, वडील, आजोबा व काका या चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी हा खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
