एकीला दगडाने ठेचले, दुसरीचे तोंड उशीने दाबून…, नागपुरात अनैतिक संबंधातून दोन महिलांचा खून

फुले शाहू आंबेडकर
0

अनैतिक संबंधातून एका गरोदर विवाहितेसह दोन महिलांचा खून

अनैतिक संबंधातून एका गरोदर विवाहितेसह दोन महिलांचा खून झाला. या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे उपराजधानी हादरली असून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पहिली घटना हिंगणा हद्दीत तर दुसरी हुडकेश्वरमध्ये उघडकीस आली. पायल मिलिंग पिल्लेवार (३०, बाबुलखेडा) आणि सुषमा काळबांडे (३५, दिघोरी) अशी खून झालेल्या महिलांची नावे आहेत.
पहिल्या घटनेतील पायल पिल्लेवार हिचे अमरावती येथील आकाश गजभिये याच्याशी लग्न झाले होते. मात्र, पायलचे राजू शंभूजी पाणतावणे (४०, घोगली) याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे ती पतीला सोडून वर्षभरापूर्वी माहेरी आली व राजू पाणतावणे याच्या घरी राहायला गेली. राजूकडून ती पाच महिन्यांची गर्भवती होती. राजूला दारुचे व्यसन होते. त्यावरुन त्याचे पायलशी वाद होत होते. शनिवारी दुपारी राजूने उशिने पायलचे तोंड दाबले. त्यात गुदमरून पायलचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी राजूला अटक केली.
दुसऱ्या घटनेत, सुषमा काळबांडे ही स्वयंपाकाच्या कामाला जात होती तर तिचा पती भाजीविक्रेता आहे. तिचे आरोपी दीपक इंगळे या युवकाशी अनैतिक संबंध होते. यादरम्यान सुषमाने आणखी एका युवकाशी प्रेमसंबंध जुळवले. यामुळे प्रियकर दीपक याचा जळफळाट होत होता. गुरुवारी दीपकने सुषमाला फिरायला जाण्यासाठी गळ घातली. दीपक आणि सुषमा दोघेही दुचाकीने हिंगण्याजवळील रुई पांझरा परिसरात गेले. तेथे दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सुषमाला त्याने अन्य युवकाशी असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. तिने नकार देताच दीपकने तिच्या डोक्यावर मोठा दगड घालून ठार केले. आज शनिवारी हे हत्याकांड उघडकीस आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default