दुचाकीला वाचविण्यात बस खोल नाल्यात; धडगाव– शहादा रस्‍त्‍यावर अपघात

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसला नंदुरबारमध्‍ये अपघात झाला आहे. वळण रस्‍त्‍यावर दुचाकीला वाचविण्याच्‍या  प्रयत्‍नात बस खोल नाल्‍यात पडली आहे. यात जीवितहानी झाली नसल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या  नंदुरबार विभागाच्‍या बसचा धडगाव ते शहादा रस्त्यावर काकरदा गावाजवळ देवबारी घाटात हा अपघात आज सायंकाळी झाला. घाट रस्‍ता असल्‍याने वळणावर समोरून येत असलेले वाहन दिसत नाही. यात देवबारी घाटातील वळण रस्‍त्‍यावर समोरून अचानक दुचाकी आली. या दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्‍न बस चालकाने केला. यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्‍याने बस खोली नाल्‍यात गेली.

मदतकार्य सुरू

प्रवाशांना घेवून जात असलेली बस खोल नाल्यात उतरल्याने अपघात झाला आहे. या अपघातात कुणी जखमी नसल्याची प्राथमिक माहिती प्राप्‍त झाली आहे. बसचा अपघात झाल्‍याचे समजताच प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सध्‍या सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default