लाचखोरीने खाकी डागाळली : तिघे लाचखोर पोलिस आरोपी अँन्टी करप्शन ब्युरो च्या ताब्यात

फुले शाहू आंबेडकर
0
फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीतील बामणोद येथे पत्त्याचा क्लब  असून तक्रारदार यांनी त्यांच्या पत्यांच्या क्लबवर कोणतीही कार्यवाही नकरता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४,०००/रु. ची लाच देण्या प्रकरणी सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे वय-५२,पोलीस नाईक किरण अनिल चाटे वय-४४, पोलीस नाईक महेश ईश्वर वंजारी वय-३८ फैजपूर पोलिस स्टेशन ला नेमणूक असलेले या तीन्ही आरोपींना लाच रक्कम रु ४०००/- स्वीकारतांना रंगे हात  अँन्टी करप्शन ब्युरो ,जळगाव यांनी ताब्यात घेतले.
पाडळसे ता.यावल येथील तक्रारदार यांनी दि.२४ मार्च २०२३ रोजी तक्रार देऊन फैजपूर पोलिसस्टेशन येथे जाऊन वरील तिन्ही आरोपितांची भेट घेण्यास गेले असता वरील आरोपी हेमंत वसंत सांगळे हे भेटले त्यांनी तक्रारदार यांच्या कडे कामाची व पैशांची बोलणी करून आरोपी सांगळे यांनी त्यांच्या मोबाईल फोन वरून आरोपी किरण चाटे यांना फोन केला तक्रारदार रु.४०००/- देत आहे.
तक्रारदार यांचे कडून किती रुपये घ्यायचे याबाबत सांगळे यांनी बोलणी करून तक्रारदार यांचेकडे फोन दिला असता तक्रारदार व आरोपी चाटे यांचे बोलणे झाल्यावर आरोपी सांगळे यांना लाचेच्या रक्कमेत तडजोड करून सदर लाच रक्कम आरोपी सांगळे यांचेकडे देण्यास सांगितले. त्यानुसार आरोपी हेमंत सांगळे यांनी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी व किरण चाटे यांचेसाठी ३,०००/- रुपये लाचेची मागणी करून पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेतील अंमलदारांसाठी १,०००/-रु.अशी एकुण दरमहा ४,०००/रु.प्रमाणे लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाचेची रक्कम आरोपी सांगळे  यांनी पंचासमक्ष स्वतःस्विकारून आरोपी महेश वंजारी यांचेजवळ दिली असता आरोपी वंजारी यांना सदर रक्कम पत्त्याचा क्लब सुरळीत चालु देण्यासाठीची माहिती असतांना त्यांनी ती लाच रक्कम ४००० /- स्वीकारली. सदर तीन्ही आरोपीतांविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 
सदर सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. तपास अधिकारी एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. तसेच सापळा पथक स.फौ.दिनेशसिंग पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, व कारवाई मदतनीस पथक एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी कार्यवाही केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default