सागर तारांचद तुलसाणी (वय 24) व ताराचंद तुलसाणी (रा. दुसेजा फॅक्टरीच्या पाठीमागे, कुमार नगर, साक्री रोड, धुळे) अशी जखमी पिता-पुत्राची नावे आहेत. काल दि. 23 रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान झुलेलाल मंदिराजवळील आसुदमल कसारामल किराणा दुकानासमोर बंटी होतचंद बजाज (वय 31 रा. कुमार नगर) याने दारू पिण्यासाठी शंभर रूपयांची मागणी केली.
ते दिले नाही म्हणून त्याने सागर यास शिवीगाळ करीत मारहाण केली. खिशातील चाकु काढून पोटात खुपसला. तेव्हा सागर यास वाचविण्यासाठी त्याचे वडील तारांचद तुलसाणी हे आले असता त्याने त्यांच्याही पोटात चाकु खुपसून दोघांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केली.
याबाबत सागर तुलसाणी याच्या जबाबावरून बंटी बजाजविरोधात भादंवि कलम 307, 326, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष तिगोटे करीत आहेत.
